। लंडन । वृत्तसंस्था ।
मार्गारेट कोर्ट यांच्यासह सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचा विक्रम नावावर असलेल्या नोवाक जोकोविचसमोर होत असलेल्या विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत लोरेंझो मुसेटीचे आव्हान असणार आहे. नोवाक जोकोविच याने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीसाठी टेनिसकोर्टवर न उतरताच उपांत्य फेरीत प्रवेश केला. अॅलेक्स दी मिनॉर याने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे जोकोविचला उपांत्य फेरीत पाऊल ठेवता आले. लोरेंझो मुसेटी याने टेलर फ्रिट्झ याचे कडवे आव्हान पाच सेटमध्ये परतवून लावत अंतिम फेरीत वाटचाल केली. मुसेटी याने फ्रिट्झ याच्यावर 3-6, 7-6, 6-2, 3-6, 6-1 असा विजय मिळवला.
पारडे सर्बियन खेळाडूच्या बाजूने जोकोविच-लोरेंझो मुसेटी यांच्यामध्ये आतापर्यंत सहा लढती पार पडलेल्या आहेत. त्यापैकी पाच लढतींमध्ये जोकोविचने विजय संपादन केले आहेत. यंदा फ्रेंच ओपन स्पर्धेत हे दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर आले होते. जोकोविचने पाच सेटच्या झुंजीनंतर विजय मिळवला होता. या लढतीनंतरच जोकोविचला दुखापत झाली होती. सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे पारडे या वेळी जड आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.







