सीईटी परिक्षा रद्द झाल्याने पुस्तके विक्रेत्यांचे नुकसान

। चिरनेर । वार्ताहर ।
दहावी,बारावीची सीईटी परीक्षा रद्द झाल्याने पुस्तके खरेदीसाठी उरण शहरासह तालुक्यातील ग्रामीण विभागातील पुस्तके विक्रेत्यांकडे विद्यार्थी फिरकतच नाहीत. त्यामुळे या विक्रेत्यांचे हजारो रुपयांचे अतोनात नुकसान झाले आहे.

राज्य शासनाने कोरोना संसर्गजन्य विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक गर्दी होऊ नये, शाळा कॉलेजातील विद्यार्थी,विद्यार्थ्यीनी कोरोना बाधित होऊ नये,याचे गांभिर्य लक्षात घेऊन दहावी व बारावीची परिक्षा न घेता दोन्ही वर्गातील वार्षिक निकाल जाहीर करण्यात आला.मात्र शैक्षणिक परिक्षा न घेतल्याने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सीईटी परिक्षा घेण्याचे राज्य शासनाने निश्‍चित केले होते.

मात्र त्यानंतर राज्य शासनाने अचानकपणे दहावी व बारावीच्या सीईटी परिक्षा रद्द केल्याने पुस्तके विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले असून,मागील दिड ते पावणेदोन वर्षांपासून वाढत्या कोरोना संसर्गामुळे या पुस्तके विक्रेत्यांच्या व्यवसायाला उतरती कळा लागली असतांना आत्ता ही सीईटी परिक्षा मार्गदर्शनाची पुस्तकांचे ढिगारे दुकानात घुळखात पडून राहिल्याने तालुक्यातील मेटाकुटीस आलेल्या पुस्तक विकर्त्यांना अक्षरशः उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

पुस्तके विक्रेत्यांना नाममात्र नफ्यावर पुस्तके विक्रीचा व्यवसाय करावा लागत आहे. त्यातच मागील 16 ते 17 महिन्यांपासून कोरोना संसर्गामुळे पुस्तके विक्रीचा व्यवसाय ठप्प झाला असतांनाही उनवार रक्कम उपलब्ध करून आणलेली दहावी ,बारावीची सीईटी मार्गदर्शिका पुस्तके शासनाने सीईटी परिक्षा रद्द केल्याने पडूनआहेत. त्यामुळे आमचे मोठे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाने पुस्तके विक्रेत्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Exit mobile version