पाकिस्तानी खेळाडूंचे नुकसान

| कराची | वृत्तसंस्था |

टी-20 विश्‍वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहे. आता पीसीबीने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीविरोधात मोठा निर्णय दिला आहे. या तिन्ही खेळाडूंना परदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. हे तिन्ही खेळाडू पाकिस्तान संघाच्या सर्व फॉरमॅटचे खेळाडू आहेत आणि पुढील 8 महिन्यांत राष्ट्रीय संघाला त्यांची गरज आहे. त्यामुळे या तिन्हींवरील कामाचा ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे पीसीबीकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version