। पनवेल । वार्ताहर ।
शासनाचे सर्व्हर अनेक दिवसापासून बंद असल्यामुळे ऑनलाईन बायोमॅट्रिक चाचणी घेऊन रेशनिंग दुकानात धान्य वाटप करता येत नाही. त्यामुळे दुकानदारांचे नुकसान होत आहे. या संदर्भात पनवेलचे भरत पाटील यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन संबंधित त्रुटी दूर करण्याची मागणी केली आहे.
महराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात महागाईमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. मध्यमवर्गीय समाजही रेशनिंगमधील धान्य घेण्यास इच्छुक आहे. परंतु वार्षिक उत्पन्नाची मर्यादा असल्यामुळे सार्वजनिक अन्नधान्य वितरण योजनेचा बट्याबोळ झाला आहे. सध्या अनेक दिवसांपासून पनवेल तालुक्यासह जिल्ह्यातील शासनाचे सर्व्हर काम करत नसल्यामुळे ई-पॉज मशीनवरील बायोमॅट्रिक चाचणी पद्धत बंद आहे.
शासनाचे सर्व्हर सतत बंद असल्यामुळे शासकीय नियमानुसार दुकानदारांना ऑनलाईन पद्धतीने बायोमॅट्रिक चचाणी घेऊन रेशनिंग दुकानात धान्य वाटप करता येत नाही. तसेच ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटप केले तर दुकानदारांना नियमित मिळणारे धान्य वाटपाचे कमिशन मिळत नाही.
सर्वर बंदमुळे रेशनिंग दुकानदारांचे नुकसान
