हरविलेल्या मुलींना केले पालकांच्या स्वाधीन

मुरुड पोलिसाचे सर्वत्र कौतुक
। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील नांदगाव जेट्टी या ठिकाणी दोन अल्पवयीन आदिवासी मुली फिरत असून या अज्ञात मुलींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून अवघ्या 24 तासाच्या आत त्यांच्या आई वडिलांना शोधून त्या मुलींना त्यांच्या ताब्यात दिल्याबद्दल मुरुड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुरुड पोलिसानं कडे कोणतीही माहिती नसताना पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सूत्रे हलवून या हरवलेल्या मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नांदगाव जेट्टी येथे दोन आदिवासी मुलींविषयी माहिती पोलिसांना मिळाली. सहाय्य्क पौजदार दीपक राऊळ, पोलीस नाईक विलास आंबेतकर, पोलीस नाईक सुरेश वाघमारे, महिला पोलीस नाईक नीलिमा वाघमारे, पोलीस शिपाई सागर रसाळ हे तातडीने या ठिकाणी पोहचून मुलींना मुरुड पोलीस ठाण्यात घेऊन येतात. त्यांची विचारपूस केल्यावर त्यांनी त्यांची नावे सांगितली पण त्यांना आपल्या गावाचे नाव सांगता येत नव्हते.दिघी पोलिसांनी सुद्धा खूप मेहनत घेत या मुलींच्या आई वडिलांना शोधले व तात्काळ त्यांना मुरुड पोलीस ठाणे येथे पाठवण्यास मदत केली. आई वडील दिसताच मुली आई वडिलांना बिलगल्या पोलिसांच्या माणुसकीचे दर्शन घडून आले. तातडीने मुलींचा ताबा आई वडिलांना देण्यात आला.

Exit mobile version