हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत

| म्हसळा | प्रतिनिधी |

म्हसळा पोलीस ठाणे हद्दीतील विविध ठिकाणी हरवलेले मोबाईल फोन शोधून काढण्यामध्ये स्थानिक पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सीइआयआर
(ceir) पोर्टलवर ट्रेसिंगसाठी नोंदवलेले मोबाईल ट्रेस करून सुमारे 1.20 लक्ष रुपये किमतीचे 6 स्मार्ट फोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. हे मोबाईल फोन संबंधित तक्रारदारांना उप विभागीय प्र.पोलीस अधिकारी सूर्यवंशी यांच्या हस्ते थेट त्यांच्या स्वाधीन करण्यात आले असल्याचे म्हसळा तालुका पोलीस निरीक्षक संदिप कहाले यांनी माहिती देताना सांगितले.

मोबाईल प्राप्त करणाऱ्या तक्रारदारांमध्ये संतोष पानसरे, स्वप्नील लाड, योगेश भागवत, सुदेश देवडे, जमीर तुरूक आणि अजिज नजीर यांचा समावेश आहे. ही कामगिरी रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत प्रामुख्याने पोलीस निरीक्षक संदीप कहाळे, उप पोलीस निरीक्षक रोहिणकर, पोलीस कॉन्स्टेबल गजानन कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बोगाणे आणि पो.कॉ.पगार यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. हरवलेले मोबाईल फोन परत मिळाल्याने तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले असून म्हसळा पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले आहे. तसेच, आपला मोबाईल हरवल्यास पोर्टलवर त्वरित नोंद करण्याचा सल्ला म्हसळा पोलीस प्रशासनाने नागरिकांना दिला आहे.

Exit mobile version