। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील डिकसळ येथून एक ऑगस्ट रोजी घराबाहेर उभी असलेली प्रवासी रिक्षा चोरीला गेली होती. ही रिक्षा अंबरनाथ येथे आढळून आली असून, पोलिसांकडून सदर रिक्षा कोणत्या कारणासाठी, कोणी पळवून नेऊन ठेवली याबाबत तपास सुरू आहे.
नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील डिकसळ गावाच्या हद्दीत राहणारे प्रवीण म्हसे यांनी एमएच 46 डी 3989 ही प्रवासी रिक्षा नेहमीप्रमाणे एक ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता आपल्या घराबाहेर उभी केली होती. त्यानंतर दहा वाजता प्रवासी आणायचे असल्याने ते रिक्षा घेण्यासाठी गेले असता तेथे रिक्षा नव्हती आणि त्यामुळे रिक्षेचा शोध म्हसे यांच्याकडून घेण्यात आला. शेवटी दोन ऑगस्ट रोजी रीतसर तक्रार नोंदविण्यात आली होती.







