कडाक्याचे ऊन आणि अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे सध्या भाजीपाला मार्केटमध्ये आवक कमी झाल्याने दर चांगलेच वधारले आहेत. अवकाळीने अनेक शेतातील भाजीपाल्याचे नुकसान झाले तर दुसरीकडे कडाक्याच्या उन्हामुळे पालेभाज्या खराब झाल्या आहेत. सध्या आवक कमी, त्यात भाजीपाला खराब होत असल्यामुळे दर वाढले आहेत. घाऊक बाजारापेक्षा किरकोळ बाजारात दरातील दर दुपटीने वाढले आहेत. जो पर्यंत उन्हाचा पारा खाली येणार नाही, तोपर्यंत भाजीपाल्याचे दर चढे राहणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.