| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचे एक-दोन कार्यकर्ते गेल्याने पक्षाला काहीही फरक पडत नसून, निष्ठावंत कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षातच आहेत. निष्ठावंत कार्यकर्ते हीच पक्षाची खरी ताकद आहे, असे प्रतिपादन शेकापचे ज्येष्ठ नेते विजय गिदी यांनी केले. रविवारी (दि. 17) पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक मुरुड येथील मनोहर बैले यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री. गिदी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील, जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वावर येथील कार्यकर्ता व तालुक्यातील लोकांचा विश्वास असल्याने हा पक्ष तळागळातील लोकांच्या मनातला पक्ष आहे आणि तो मजबूत आहे. निष्ठावान कार्यकर्ता हीच खरी शेतकरी कामगार पक्षाची ताकद असून, पक्षाचे ध्येय धोरण आणि पक्षाने केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत नेण्याचे काम कार्यकर्त्यांमार्फत होत आहे. मुरुड तालुक्याच्या विकासामध्ये शेकापचे योगदान अमूल्य असून, सदैव एकनिष्ठ राहणारे कार्यकर्ते हेच पक्षाचे बळ आहे, असेही गिदी म्हणाले. दलबदलू माणसांना त्यांची जागा येथील जनताच जागा दाखवले, असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी मनोहर बैले,चंद्रकांत कमाने, वामन चुनेकर, तुकाराम पाटील, विजय गिदी, निता गिदी, पांडुरंग आगरकर, मनोहर मकु, माजी नगरसेवक आशिष दिवेकर, राहील कडू, रिझावान फहीम, भगूरकर शरह, कमलाकर भात, संतोष जमनू, गणेश नाक्ती, फैसल उलडे, गणेश भोईर, फुरकान हुजूक, वसिम अनवारी, भरत माळी, मयूर पोटीत, विनायक चोगले, एजाज सुबेदार, जमीर शहरी, सरोज दिवेकर, एम.एम. ठाकूर, गुलाब वाघमारे, सुप्रिया गिदी, शरद चौरकर, विजय म्हात्रे, किशोर धामणस्कर, कमलाकर भांणे, सतोष जमन, गणेश भोईर, वसीम अनवारी, भरत माळी, मयूर भोईर, विनायक चोगले, एजाज सुभेदार, जमीर कादिरी, सरोज दिवेकर, दिपक पाटील, संदीप चिरायु, अजित आयरकर, श्रीकांत वारगे, राजेश्री गायकर, सज्जाद उलडे, नाझ कारभारी, दत्ताराम धनावडे, उमेश अपराध, प्रकाश मयेकर, अमोल पाटील, बाबमिया कारभारी, संकेत अपराध, आण्णा पाडगे आदींसह तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनी शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो, असा एकच नारा दिला. काहीही झालं तरी आम्ही शेतकरी कामगार पक्षाबरोबर, आ. जयंत पाटील यांच्याबरोबर राहणार, असे मत प्रत्येकाने व्यक्त केले.