सोगाव येथे आलिशान चषक क्रिकेट स्पर्धेला प्रतिसाद

नृपाल पाटील यांच्या हस्ते उदघाट्न
| सोगांव | वार्ताहर |

सोगाव, ता.अलिबाग येथे आलिशान चषक नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धचे उद्धाटन रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध असा नावाजलेला क्रिकेटचा संघ म्हणून नाव आलिशान अलिबाग तालुक्यातील सोगांव येथील आलिशान सोगांव संघ आहे.हा संघ उत्कृष्ट असा क्रिकेट खेळणारा व नाईटचे क्रिकेटचे सामने आयोजित करणारा संघ आहे. या संघाने मरहूम इर्शाद कप्तान पुरस्कृत आलिशान कप 2022 चे आयोजन केले आहे. यावेळी उपस्थित जि.प.समाज कल्याण सभापती दिलीप भोईर, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, युवराज पाटील. सोगांवचे ज्येष्ठ कार्यकर्ते कुतुबुद्दीन कप्तान, मजिद कूर, लाइक कप्तान, जगन्नाथ पाटील, रवींद्र म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. नृपाल पाटील यानी आयोजकांचा उत्कृष्ट शिस्तबद्द नियोजनाबद्दल गौरव केला तसेच खेळाडूंना शुभेच्छा दिल्या, छोटमशेठ यांनी आयोजकांना व स्पर्धकांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या आहेत. स्पर्धेत सूत्रसंचलन अजित हरवडे सर यांनी केले.

Exit mobile version