| खांब | वार्ताहर |
सुतारवाडी येथे दि.27 डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या रोहा तालुका विज्ञान प्रदर्शनात एम.बी.पाटील स्कूल वरसे या स्कूलने प्रथम क्रमांक संपादित करून यश मिळविले आहे.
तालुका विज्ञान प्रदर्शनात या स्कूलच्या पुष्कर टिळक, दिग्विजय लांडे, प्रथमेश गोसावी, प्रतिक जगताप, यशस्वी डाके यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृतीस प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. या विद्यार्थ्यांना येथील शिक्षिका रूकसाना सय्यद यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. तर विद्यार्थीवर्गाने मिळविलेल्या यशाबद्दल सर्व संस्थाचालक, येथील मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आहेत.