मतदान प्रक्रिया लांबणीवर
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग शहरातील कन्या शाळा येथील सखी मतदान केंद्र मशीनमध्ये बिगाड होण्याबरोबरच वायरिंगची समस्याही उद्भवली होती. त्यामुळे मतदान प्रक्रिया काही वेळ लांबणीवर गेली. मतदान केंद्रात जुनी मशीन बदलून नवीन मशीन लावल्याने तसेच विद्युतीकरणाचे काम झाल्यानंतर मतदानाला सुरुवात झाली. मशीनमधील एक नंबरचे बटन दाबले जात नव्हते. त्यामुळे मतदान करताना मतदारांना अडथळे निर्माण झाले. या घटनेची माहिती थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षया नाईक आणि माजी नगरसेविका संजना किर यांना मिळताच त्यांनी मतदान केंद्रात धाव घेऊन नवीन मशीन बदलण्याची मागणी केली. त्यानंतर मशीन बदलण्यात आल्यावर मतदानाची प्रक्रिया सुरळीत झाली.







