| पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील राबगाव येथील राष्ट्रीय कीर्तनकार कृष्णकांत उमाजी भोईर यांची सून माधवी मधुकर भोईर यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे नुकतेच निधन झाले. त्या 46 वर्षाच्या होत्या. त्यांचे पार्थदेहावर मुंबई भोईवाडा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात सासू,सासरे, पती, मुलगा असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी शनिवार दि. 24 फेब्रुवारी रोजी राबगाव येथील वरदायिनी मंदिर येथे होतील तर उत्तरकार्य मंगळवार दि. 27 फेब्रुवारी रोजी राबगाव येथील राहते घरी होतील.







