माधवी कुलकर्णी सेवानिवृत्त

। अलिबाग । वार्ताहर ।

36 वर्षाच्या अखंड विद्यादानाच्या पवित्र कार्यातुन माधवी राजन कुलकर्णी आरसीएफ स्कूलमधून सेवानिवृत्त झाल्या आहेत. आपल्या कार्यकाळामध्ये त्यांनी वारणा महाविद्यालय वाणानगर, जेएसएम कॉलेज अलिबाग, एसआरटी ज्युनिअर कॉलेज रेवदंडा व त्यांनतर अखेर आरसीएफ स्कूल येथे काम केले आहे. जीवशास्त्र विषयातील ख्यातनाम शिक्षिका म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. विद्यादाना बरोबरच अनेक विद्यार्ध्यांना तालुका, जिल्हा, राज्य व देश पातळीवर विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रकल्प मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. विज्ञान प्रदर्शनामध्ये परिक्षक, मार्गदर्शक म्हणून त्यांनी उल्लेखनिक कार्य केले आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी डॉक्टर, संशोधक, सैनिक अधिकारी, पत्रकार म्हणून जगभर काम करत आहेत. तसेच, माजी विद्यार्थी संम्मेलनामध्ये त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

Exit mobile version