| मुंबई | प्रतिनिधी |
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मधुकर पिचड यांना ऑक्टोबरमध्ये ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना नाशिकमधील नाईन पल्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून मधुकर पिचड यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, शुक्रवार (दि.6) वयाच्या 84 व्या वर्षी मधुकर पिचड यांनी अखेरचा श्वास घेतला.
मधुकर पिचड यांच्या निधनामुळे अकोले तालुक्यावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, मधुकर पिचड हे राज्याचे माजी मंत्री होते. अहिल्यानगर (अहमदनगर) अकोले विधानसभा मतदारसंघातून 1980 ते 2004 या काळात मधुकर पिचड हे तब्बल सात वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तसेच मधुकर पिचड यांनी अनेक महत्त्वाची पदे भुषवली आहेत. तसेच आदिवासी विकास, वन व पर्यावरण मंत्री म्हणूनदेखील कार्यभार त्यांनी पाहिला होता. अकोले तालुक्यामधील विकासात मधुकर पिचड यांचं महत्त्वाचं योगदान मानलं जातं. दरम्यान, 2019 मध्ये मधुकर पिचड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.
मधुकर पिचड यांचे निधन
