| उरण | वार्ताहर |
उरण चिरनेर येथील नायब तहसीलदार माधुरी काशिनाथ मोकल या सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम तहसील कार्यालयात संपन्न झाला. यावेळी तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी त्यांच्या कामाबद्दल गौरव उद्गार काढले. त्यांनी ठाणे, कर्जत, उरण अशा ठिकाणी काम केले होते. यावेळी काशिनाथ मोकल, शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस शेखर पाटील, दिलिप नाळे, मनोज डाके तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
माधुरी मोकल सेवानिवृत्त
