‘मद्रास कॅफे’ ची अभिनेत्री खंडणी प्रकरणात अटक

। चेन्नई । वृत्तसंस्था।
‘मद्रास कॅफे’ चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री लीना मारिया पॉल हिला दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. 200 कोटींच्या खंडणीप्रकरणात लीनाविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. हे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. खंडणी प्रकरणात सुकेश चंद्रशेखरचं नाव उघड झाल्यानंतर आता लीनाविरोधात सबळ पुरावे असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. लीना ही सुकेशची गर्लफ्रेंड आहे. एआयडीएमकेचे निवडणूक चिन्ह मिळवून देण्याच्या आरोपाखाली सुकेश सध्या तिहार जेलमध्ये आहे. खंडणी प्रकरणात लीनाचा सक्रीय सहभाग असल्याचे सबळ पुरावे तपास यंत्रणांना सापडले आहेत. लीनावर फोर्टीस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांची पत्नी अदिती सिंगला फसवण्यात सुकेशला मदत केल्याचा आरोप आहे.

Exit mobile version