| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुका मराठी पत्रकार संघ आणि कर्जत प्रेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मध्यरात्रीच्या ध्वजारोहण समारंभास कर्जतकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उदंड प्रतिसाद दिला. मध्यरात्रीच्या ध्वजारोहणाचे हे आठरावे वर्ष आहे.
कर्जतच्या स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब राऊत चौकात 14 ऑगष्ट रोजी मध्यरात्री ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते. चौकाच्या नामफलकाला ज्येष्ठ नागरिक जे.एम. मिर्झा यांनी पुष्पहार अर्पण केला. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले, कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल देशमुख यांच्या हस्ते 12 वाजून 2 मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे, संजय गायकवाड, ज्ञानेश्वर बागडे आदी उपस्थित होते. डॉ. नितीन आरेकर यांनी सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी विद्यमान नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह माजी नगराध्यक्ष रजनी गायकवाड, राजेश लाड, किसान मोर्चा कोकण संपर्कप्रमुख सुनील गोगटे, माजी नगरसेवक संतोष पाटील, नितीन परमार, माजी नगरसेविका बिनिता घुमरे, विजय हरिश्चंद्रे, राजाभाऊ कोठारी, विकास चित्ते, राहुल तिटकारे, मुफद्दल डाभिया, विनायक उपाध्ये, प्रभाकर गंगावणे, अरुण निघोजकर, वैशाली तिटकारे, असीफ मिर्झा, रमाकांत जाधव, अभिजीत रेणोसे, चंद्रशेखर परदेशी, हुसेन जमाली, सूर्यकांत शहा, प्रशांत उगले, महेंद्र चंदन, जितेंद्र माळी, आमिर मणियार, निकेश फाळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.