पिरकोनमध्ये महाआरोग्य शिबीर

। पनवेल । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्ष व जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि ग्रामपंचायत, पिरकोन यांच्या वतीने उरण तालुक्यातील पिरकोन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर रविवारी (दि.21) संपन्न झाले. या शिबिरामध्ये सांधेदुखी, दातांची तपासणी आणि डोळे तपासणी करण्यात आली.

शिबिरात समृद्धी क्लीनिक, समृद्धी डेंटल केअर, नायर सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटल, नवदृष्टी सेवा संस्था, ट्रू डायग्नो यांनी नागरिकांना मोफत सेवा देऊन शिबीर यशस्वी पार पाडले.
शिबिराचे उद्घाटन माजी जि.प. सदस्य जीवन गावंड, रमाकांत जोशी, डॉ.मंदार शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हरेंद्र गावंड, अनंता गावंड, जगदीश गावंड, विलास गावंड, सुरेंद्र गावंड, सुधीर गावंड उपस्थित होते. या शिबिरात डॉ.मंदार शहा, डॉ.भाग्यश्री शहा, डॉ.संतोष कुमार नायर, डॉ.मनस्वी भिंगार्डे ,परेश पाटील, सुशांत पाटील,प्रिया पाटील,अक्षय कोळी,विक्रांत ठोकले यांनी मोफत सेवा दिली.

ग्रामीण भागात बारमाही शेतीची कामे केली जातात. यामुळे शेतकरी बांधवांना सांधेदुखी आणि डोळ्यांचे आजार मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळतात. त्यामुळे आरोग्य शिबीर राबवून सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.

– प्रितम म्हात्रे, अध्यक्ष जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था



Exit mobile version