मविआची 29 जागांवर आघाडी

सुप्रिया सुळे अकरा हजार मतांनी पुढे

। मुंबई । प्रतिनिधी ।

संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीलासुरुवात झाली आहे. सुरुवातीला टपाली मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर ईव्हीएम यंत्रांमधील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विधानसभानिहाय 14 टेबलवर मतमोजणी होईल. म्हणजे प्रत्येक लोकसभेत एकूण 84 टेबलवर मतमोजणी होईल. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर निकालाचे प्राथमिक कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. तर, पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात शरद पवार गट 9, उद्धव ठाकरे गट 10, काँग्रेस 10 तर भाजप 13, शिंदे गट 4, अजित पवार गट 1 जागांवर आघाडीवर आहे. यावेळी, दुसऱ्या फेरीत हि बारतामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे 11 हजार 532 मतांनी आघाडीवर आहेत.

Exit mobile version