| माणगाव | प्रतिनिधी |
महाराष्ट्र पोलीस न्युज – 24 यांच्यातर्फे तृतीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात रायगड जिल्ह्यात नावलौकिक कमाविलेल्या महाआराध्य प्रतिष्ठानचा समाजरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पुणे येथे रविवार दि.22 मार्च रोजी झालेल्या भव्य दिव्य अशा कार्यक्रमात महाआराध्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद धारिया व संस्थापक संचालिका अंकिता प्रसाद धारिया यांना आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
महाआराध्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद धारिया, संचालिका अंकिता धारिया हे आपण समाजाचे काहीतरी देणेकरी लागतो, या उदात्त हेतूने आपल्या प्रतिष्ठानमार्फत विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवित असतात. त्यामुळे या प्रतिष्ठानचे नाव आज रायगड जिल्ह्यात सर्वदूर पोहचले आहे. या प्रतिष्ठानच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल महाराष्ट्र पोलीस न्युज – 24 यांनी घेऊन त्यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.







