रंगछंद कलाकार व सहरंग कला अकादमीची संकल्पना
| पाताळगंगा | प्रतिनिधी |
मुंबई – पुणे महामार्गावर अष्टविनायका पैकी एक असेलेले महड गावातील वरद विनायक यांचे दर्शन घेण्यासाठी खालापूर, चौक, खोपोली, कर्जत, पनवेल, रसायनी या परिसरातील हजारो भक्त आपल्या लाडक्या वरद विनायकाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. संकष्टी चतुर्थी निमित्ताने महाभारत या विषयावर सुंदर अशी मनमोहक रांगोळी रंगछंद मंडळ अध्यक्ष रोशन पाटील (कसरखंड ) व सहरंग कला अकादमी, कलाशिक्षिका श्रावणी पाटील यांच्या संकल्पनेतून काढण्यात आली.
ही रांगोळी काढण्यासाठी 35 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला. तसेच ह्या रांगोळीसाठी 30 तास एवढा कालावधी लागला असून, ही रांगोळी 10/30 फुट असून यामध्ये सप्त रंग तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, जांभळा, निळा, पांढरा, लाल आदी रंगाचा वापर करण्यात आला. त्याच बरोबर 25 कलाकर यांनी एकत्र येऊन ही भव्यदिव्य अशी रांगोळी साकारली आहे. ही रांगोळी रोशन पाटील, अश्विनी सरदार, शुभम कुमरे, योगेश डाकी, रोहित भोईर, मधुरा भोईर, मिताली सुर्वे, रवी चौधरी, अमोल खणावकर, जय भोईर, यशोदीप पाटील, गीतेश पाटील, शैलेश पाटील, अजित मिटकरी, अंकित गोजे, नम्रता गोंधळी, सरोज पाटील, आकांक्षा भगत, हेतल म्हात्रे, पद्मिनी खाडे, मोहिनी विशे, पूजा कदम, अरुण काळोखे, मनोहर ठाकूर, ज्योती पाटील, ज्योती म्हात्रे , सुयोग म्हसकर, हर्ष क्षीरसागर आदींनी मेहनत घेतली.







