महाड एमआयडीसीत अग्नीतांडव;टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग

। महाड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीतील (MIDC) एका कंपनीला भीषण आग लागली आहे. गुरुवारी (दि.20) कंपनीत आग भडकली. परिसरात अनेक कंपन्या असल्यामुळे ही आग लवकराच लवकर आटोक्यात आणण्याचं मोठं आव्हान अग्निशमन दलासमोर आहे.

सध्या अग्निशमन दलाचे जवान या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या येथील परिसरात धुराचे साम्राज्य बघायला मिळत आहे.

Exit mobile version