महाड ग्रामीण रुग्णालय ठरले अव्वल

बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्काराने सन्मान

| महाड | प्रतिनिधी |

महाराष्ट्र शासनाच्या व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने रविवारी (दि.22) राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान 2026 पुरस्कार वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे पार पडला. या निवडीसाठी बेड ऑक्यूपसी रेशो, अंतररुग्ण विभाग, बाह्य रुग्णविभाग, मोठ्या शस्त्रक्रिया, लहान शास्त्रक्रिया, स्वाभाविक प्रसूती, सिझेरियन प्रसूती व रुग्णालयीन स्वच्छता इत्यादी निकषांचा समावेश होता.

ग्रामीण रुग्णालय ट्रॉमा केअर सेंटर महाड मध्ये वरील निकषांमध्ये दर्जेदार व लोकाभिमुख कामगिरी केल्याने वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान 2026 साठी निवड करण्यात आली. प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला, यावेळी पुरस्कार स्वीकारण्यासाठी ग्रामीण रुग्णालय महाडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शंतनु डोईफोडे, परिसेविका विद्या पालकर, प्रसाद पाटील अधिपरिचारक, उदय पवार, वैभव नगरकर उपस्थित होते.

जिल्ह्यात ठरले अव्वल
ग्रामीण रुग्णालय महाड जिल्हा रायगड यांनी सार्वजनिक आरोग्य सेवा, जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा प्रदान करण्यात उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य केले आहे, त्यांच्या कर्तव्यनिष्ठा सेवाभाव व समाजहिताच्या योगदानाची दाखल घेऊन महाआरोग्य सन्मान 2026 प्रदान करण्यात आला.
Exit mobile version