आंतरराष्ट्रीय ऑनलाईन फोटो स्पर्धेत महाडच्या मित डाखवेचे यश

। महाड । प्रतिनिधी ।
फोटो वर्ल्ड संस्थेच्या वतीने भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिना निमित्ताने आंतरराष्ट्रीय ऑनलाईन फोटो स्पर्धा 2022 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी माय इंडीया असा विषय देण्यात आला होता. भारतासह विविध देशांतील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाडच्या मित डाखवे याने काढलेल्या पोतराजच्या फोटोला उत्कृष्ट फोटोग्राफीचा सन्मान देत इंटर नॅशनल स्नॅप अँवार्डने गौरविण्यात आले. मित डाखवे याने मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

महाडचा छाया चित्रकार मित यांच्या छायाचित्राला यापुर्वी चीझ या आंतरराष्ट्रीय मॅगेझिनमध्ये आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले होते. तर राज्यस्तरीय स्पर्धेत मित डाखवे यांना चौथा क्रमांक तर सेल्फी फोटोला तिसरा क्रमांक मिळाला होता. या स्पर्धेसाठी माय इंडीया असा विषय देण्यात आला होता. भारतासह अमेरिका, बेल्जियम, सिंगापूरसह आदी देशातील 2700 स्पर्धक सहभागी झाले होते. प्रत्येक स्पर्धकाने एक फोटो पाठवायचा होता. या स्पर्धेत महाडचा मित यांनी आपल्या घरा समोरील रस्त्यावर काढलेला पोतराजचा फोटो पाठविला होता. या स्पर्धेचा निकाल 12 जून रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. त्यात मितने काढलेल्या पोतराजच्या फोटोला उत्कृष्ट फोटोग्राफीचा सन्मान देत इंटर नॅशनल स्नॅप अँवार्ड ने गौरविण्यात आले.

Exit mobile version