महाडमध्येे श्रीहरी केमिकल्स कारखान्याला आग; लाखोंचे नुकसान

महाड | प्रतिनिधी |

महाड एमआयडीसी श्रीहरी केमिकल्स एक्स्पोर्ट लिमिटेड या कारखान्याला अचानक आग लागल्याने परिसरात अनेक गावांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले . कारखाना सुरक्षायंत्रणा आणि औद्योगिक अग्निशमन दलाने काही मिनिटातच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले.
कारखान्यातील थर्मोपॅक लिकेज झाले होते. त्यामधून निघणार्‍या ऑईलने पेट घेतला आणि अचानक भडका उडाला. आगीची तीव्रता एवढी भीषण होती की या कारखान्यातील सर्व कर्मचारी वर्गाला कारखान्यातून बाहेर काढावे लागल.जवळपास 5 किलोमीटर पर्यंत आगीच्या ज्वाला दिसत होत्या. यामुळे परिसरातील टेमघर, जिते, धामणे, देशमुख कांबळे या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरवातीला कारखान्यातील कोणत्या भागाला आग लागली हे समजू शकले नाही, मात्र कारखाना सुरक्षा आणि औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दलाने शोध घेतला आणि अर्ध्या तासातच आगीवर नियंत्रण आणले.
कारखाना व्यवस्थापक अशोक जैन यांच्या कडून मिळालेल्या माहिती प्रमाणे तीन महिने हा कारखाना बंद होता. 27 जुलै रोजी हा कारखाना सुरू करण्यात आला आहे. मात्र ज्यावेळी आग लागली त्या वेळी अधिकारी वर्ग मिळून 60 कामगार कारखान्यात होते .जरी जीवित हानी झाली नसली तरी कारखान्याचे 25 लाखाचा नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले.

औद्योगिक विकास महामंडळा कडील फॅक्टरी इन्स्पेक्टर (कारखाना तपासणी यंत्रणा) ही केवळ कागदावरच असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. कारण ही यंत्रणा फक्त काही घटना झाल्यानंतरच तपासणीसाठी येत असतात आणि कागदोपत्री अहवाल देऊन आपले सोपास्कार पार पाडतात. मात्र वेळोवेळी यांच्याकडून औद्योगिक क्षेत्राची तपासणी केली जात नाही.औद्योगिक सुरक्षा नियमानची अंमलबजावणी करण्यास कारखाना व्यवस्थापक खर्चिक काम असल्याने टाळाटाळ करत असतात. त्यामुळे महाड औद्योगिक वसाहतीत वारंवार आशा प्रकारच्या घटना घडतच असतात.

Exit mobile version