| आगरदांडा | प्रतिनिधी |
श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. 1 अंतर्गत मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील माळी समाज हॉलमध्ये महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाच्या अनुषंगाने गावोगावी जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच, शिबिरादरम्यान उपस्थित ग्रामस्थांकडून विविध शासकीय सेवांसाठी अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्यानुसार अनेक सेवांचा तात्काळ लाभ शिबीरातील नागरिकांना देण्यात आला. या शिबिरामध्ये महसूल विभागामार्फत उत्पन्नाचे दाखले, वय व अधिवास प्रमाणपत्र, डिजिटल सातबारा, डिजिटल 8-अ उतारा, रेशन कार्ड, आधार कार्ड अपडेट, संजय गांधी निराधार योजना लाभार्थी नोंदणी, निवडणूक विभागाच्या सेवा फॉर्म क्र. 6 (नवीन मतदार नोंदणी),फॉर्म क्र. 7 (नाव वगळणे), फॉर्म क्र. 8 (दुरुस्ती/स्थलांतर) इत्यादी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. मान्यवरांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार आदेश डफळ, नायब तहसीलदार संजय तवर, महसूल नायब तहसीलदार राजश्री साळवी, निवडणूक नायब तहसीलदार कल्याण देऊळगावकर, पुरवठा निरीक्षक गांगुर्डे, पंचायत समिती सदस्य गणेश नाक्ती, सरपंच सेजल घुमकर, उपसरपंच मेघा मापगावकर, सदस्य वैशाली रणदिवे, उदय थळे, जितेंद्र दिवेकर, विक्रांत कुबल, फैरोज घलटे, अस्लम हलडे, यशवंत पाटील, तहसील कार्यालयातील कर्मचारी, मंडळ अधिकारी मंगेश इग्रुळकर, नांदगाव महसूल मंडळातील सर्व तलाठी व कर्मचारी उपस्थित होते.
नांदगावमध्ये महाराजस्व अभियान उत्साहात
