24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक

बदलापूर घटनेप्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक

| मुंबई | प्रतिनिधी |

बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. या प्रकरणी महाविकास आघाडीकडून बुधवारी सलग दुसर्‍या दिवशी निदर्शने करीत येत्या शनिवारी म्हणजे 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. राज्यात आता लहान मुलीही सुरक्षित नाहीत. बदलापूरची घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. या घटनेला दाबवण्यासाठी सरकारने स्वतः प्रयत्न केले, हे याप्रकरणी निदर्शनास येत आहे. घटना घडली ती संस्था आरएसएस व भाजपशी संबंधित आहे. त्यामुळे दोन्ही संघटनांची बदनामी टाळण्याचा प्रयत्न सरकारकडून केला गेला. त्याचा उद्रके कालच्या घटनेतून झाला, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. महाराष्ट्राची प्रमिा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. महाविकास आघाडीच्या बैठकीत या गंभीर मुद्द्यावर चर्चा ण्ज्ञली. त्यानंतर आम्ही या घटनेच्या निषधार्थ 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले. या बंदमध्ये महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष, शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी, पालकांचा समावेश असेल, असे पटोले म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात कायदा धाब्यावर
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कायदा धाब्यावर बसवला असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी करीत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. बदलापूरमधील प्रकार धक्कादायक आणि संताप आणणारा असल्याचे म्हणत त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन स्वतःचे ब्रँडिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हणाले.
Exit mobile version