राजू मुंबईकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

। उरण । वार्ताहर ।
मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्राच्या वतीने उरणचे राजू मुंबईकर यांना माजी खासदार भागवत कराड यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी आ.अंबादास दानवे, रमेश मुळे, जेष्ठ साहित्यिक प्रा.ऋषिकेश कांबळे संस्था अध्यक्षा डॉ.आशा पाटील, सुलक्षणा शिंदे पाटील(सचिव) आणि समस्त मानसी सेवाभावी संस्था महाराष्ट्र या संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version