महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना आक्रमक

वीज दरवाढीच्या प्रस्तावाविरोधात आंदोलन
| रसायनी | वार्ताहर |
महावितरणच्या 37 टक्के वीज दरवाढीच्या प्रस्तावाच्या विरोधात महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, वंचित बहुजन आघाडी, जनजागृती ग्राहक मंच आणि इतर सामाजिक संघटनांनी मिळून दि. 28 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.

यावेळी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे रसायनी येथील रायगड जिल्हा अध्यक्ष विजय खारकर, संघटनेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सचिन पाटील, वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष प्रदीप ओव्हाळ, प्रमोद खारकर, संदीप पाटील आदी उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रात वेळी आयोजित करण्यात आले होते. वीज ग्राहकांवर होणारा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही त्यासाठी आम्ही नेहमीच रस्त्यावर उतरू, असे मत संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले.

Exit mobile version