| नवी मुंबई | प्रतिनिधी |
देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानम मंडळाला नवी मुंबई विमान तळाजवळील कोट्यवधीचा भूखंड 40 हजार 600 रुपयांत दिल्यानंतर आता त्यालगतच दुसरा भूखंड ही या मंडळाला कवडीमोल दरात दान करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वरून आलेल्या आदेशानुसार सिडकोच्या संचालक मंडळाने याबाबतचा ठराव मंजूर केल्याने हा भूखंड देवस्थानाला बहाल करण्याची केवळ औपचारिकता उरली आहे.
आंध्र प्रदेशातील तिरुपती हे एक अत्यंत श्रीमंत आणि प्रतिष्ठित देवस्थान मानले जाते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना या देवस्थानासाठी नवी मुंबईत भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 5 मे 2022 रोजी देवस्थानाला उलवे येथील सेक्टर 12 येथे 40 हजार 400 चौरस मीटरचा भूखंड देण्यास मंजुरी देण्यात आली. नवी मुंबई विमानतळापासून अगदी जवळ असलेल्या या भूखंडाचे बाजारभावाने मूल्य कोट्यवधी रुपयांचे असताना केवळ एक रुपया प्रति चौ. मीटर दराने भूखंड देवस्थानाला देण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे तिरुमला तिरुपती देवस्थान मंडळाचे सदस्य आहेत, हे विशेष.
तिरुपतीला महाराष्ट्र सरकारचे भूदान

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606