महाराष्ट्र खो-खो असोसिएशन वार्षिक सर्वसाधारण सभा

मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र खो खो असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा 8 ऑक्टोंबर ला पीवायसी जिमखाना, भांडारकर रोड, डेक्कन, पुणे येथे आयोजित केली आहे. ही सभा असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आसून सदर वार्षिक सर्वसाधारण सभेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सदर सभा पूर्वी निसर्ग मंगल कार्यालय पुणे, येथे आयोजित केली होती. परंतु कोरोना निर्बंध व जागेची कमतरता यामुळे सदर सभा पीवायसी जिमखाना येथे आयोजित केली असल्याचे सेक्रेटरी गोविंद शर्मा यांनी कळवले आहे. या वार्षिक सर्वसाधारण सभे नंतर अर्जुन पुरस्कार विजेती खेळाडू सारिका काळे-खोत व प्रशिक्षक डॉ. चंद्रजीत जाधव यांचा भव्य सत्कार आयोजित केला आहे.

Exit mobile version