अ‍ॅड. पुंडलिक मालोरेंना महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव तालुक्यातील न्हावे गावाचे सुपुत्र तथा अ‍ॅड. पुंडलिक तुकाराम मालोरे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार 2024 जाहीर झाला, असल्याची माहिती निवड पत्र पाठवून फाऊंडेशनचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार संजय पवार व फाऊंडेशनचे रायगड जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे गुरुजी यांनी दिली. या पुरस्काराचे वितरण रविवार, (दि.12) मे रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, बाजी प्रभू देशपांडे चौक, पन्हाळगड, जि. कोल्हापूर येथे होणार आहे.

आविष्कार फाऊंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रात गेली 18 वर्षे कार्यरत आहे. या फाऊंडेशनतर्फे समाजात वेगवेळ्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींचा जिल्हा व राज्य स्तरावर पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात येतो. अ‍ॅड. पुंडलिक मालोरे यांच्या कार्याची दखल उपरोक्त संस्थेनी घेऊन त्यांची या पुरस्काराकरिता निवड करण्यात आली आहे.

Exit mobile version