नरेश विचारे यांना ‘महाराष्ट्ररत्न’

| म्हसळा | वार्ताहर |

अविष्कार फाउंडेशनतर्फे क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांना दिला जाणारा यंदाचा राज्यस्तरीय ‘महाराष्ट्ररत्न’ गौरव पुरस्कार म्हसळा तालुक्यातील शिक्षण विभागात काम करणार्‍या नरेश विचारे यांना प्रदान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पन्हाळगड येथे जागतिक न्यूरो सर्जन डॉ. संतोष प्रभू, संस्थेचे अध्यक्ष संजय पवार यांचा हस्ते विचारे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी तंत्र शिक्षक संतोष चव्हाण, पदवीधर विभाग शिक्षक किशोर मोहिते उपस्थित होते. नरेश विचारे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदानाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version