सायली जाधव, विक्रम कदम यांच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा
| मुंबई | प्रतिनिधी |
भारत सरकारच्या मान्यतेने व अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी संघटनेच्या विद्यमाने दि. 16 ते 20 या कालावधीत कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. नवी दिल्ली येथील त्यागराज क्रीडा संकुल येथे या स्पर्धा खेळविण्यात येतील. या स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याने दोन्ही संघ जाहीर केले. यंदाच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त केलेल्या सायली जाधवकडे महिलांचे, तर सांगलीच्या विक्रम कदमकडे पुरुषांच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, निवडण्यात आलेले हे दोन्ही संघ चार दिवसांच्या सरावानंतर दि. 14 ऑक्टोबर रोजी सायं. 05.10 वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून राजधानी एक्स्प्रेसने स्पर्धेकरिता रवाना झाले.
महिला संघ सायली जाधव (संघनायिका), वैशाली खरमाळे, कल्पिता शिंदे, ज्योती राक्षे, नुपूर पवार, स्वाती काकडे, जयश्री साठे, रुजिना शेख, प्रीती झगडे, माधवी राऊत, मनीषा जगताप, उज्वला वाघमारे. संघ प्रशिक्षक- संतोष जाधव, व्यवस्थापक- गणेश भोईर.
पुरुष संघ विक्रम कदम (संघनायक), महेश सावकारे, संदीप इंदुलकर, सूरज कांबळे, गणेश वावरे, अंकुश महाले, मारुती पवार, राहुल चव्हाण, निवृत्ती जगताप, सुरेंद्रसिंह मेहरा, दिनेश नाडे, गोरख पवार, गणेश काळे. संघ प्रशिक्षक- आनंद हेगडे. व्यवस्थापक- जयवंत शेट्टे.