पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ रवाना

। मुंबई । वृत्तसंस्था ।

हैदराबाद येथे क्लासिक सीनियर पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पॉवरलिफ्टिंग इंडियाच्या मान्यतेने (दि.8) ते (दि.12) एप्रिल या कालावधीत होणार आहेत. बशीर बाग न्यामपली रेल्वे स्टेशन जवळील लालबहादूर शास्त्री इन डोअर स्टेडियम येथे ही स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत 150 पेक्षा जास्त पुरुष आणि 100 पेक्षा जास्त महिला खेळाडूंचा सहभाग असेल.

महाराष्ट्र संघातील खेळाडू
सीनियर मुले -
59 किलो वजनी गट- राहुल कुमार (पुणे), बबन झोरे (रायगड)
74 किलो वजनी गट - तन्वीर कोतवाल (सांगली)
93 किलो वजनी गट - मयूर शिंदे (पुणे), अग्नेल नाडर (ठाणे)
105 किलो वजनी गट- संकेत चव्हाण (मुंबई उपनगर), गणेश तोटे (रायगड)
120 प्लस किलो वजनी गट - विजय चंडाल(पुणे),
सीनियर मुली खेळाडू-
47 किलो वजनी गट-तन्वी तापडिया(पुणे)
57 किलो वजनी गट- डॉ. शर्वरी इनामदार (पुणे)
69 किलो वजनी गट- साराह मुकादम (मुंबई उपनगर)
76 किलो वजनी गट- मायानी कांबळे (पुणे)
84 किलो वजनी गट- कॅरोलीन पेंटसी(पुणे), संहिता मलिक (मुंबई उपनगर)
84 प्लस किलो वजनी गट- प्रिया राव (मुंबई उपनगर)
प्रशिक्षक -विजय पाटील (पुणे), राजहंस मेंहदळे (पुणे), संघ व्यवस्थापक- संजय सरदेसाई.

वरील सर्व खेळाडूंना महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंगचे अध्यक्ष अर्जुन पुरस्कार प्राप्त, संजीवन भास्करन आणि सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्य स्पर्धेतील सीनियर आणि अनुभवी खेळाडूंची कामगिरी पाहता राष्ट्रीय सीनियर स्पर्धेत महाराष्ट्राचे मुले व मुली जास्तीत जास्त पदके प्राप्त करतील, असा विश्‍वास महाराष्ट्र राज्य संघटनेचे सेक्रेटरी संजय सरदेसाई यांनी केला आहे.

Exit mobile version