सचिन कांबळे यांना महाराष्ट्राचा बेस्ट डिरेक्टर पुरस्कार

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
ज्यांच्या गाण्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे गाण्यांच्या ठेक्यावर थिरकायला भाग पाडत आहे, प्रत्येक मराठी चैनल वर त्यांची गाणी दिसत आहेत मग ते 9एक्स झकास, माय बोली, झी वाजवा, संगीत मराठी असो तसेच यूट्यूब चैनल वर ज्यांची 100 मिलियन व्ह्यूज पर्यंत गाणी पोहोचलेली आहेत, लोकांच्या घराघरात आणि मनात यांच्या गाण्यांनी घर करून ठेवले आहे, वेगवेगळ्या प्रोडक्शन खाली यांची बरीचशी गाणी लोकांपर्यंत पोचली आहेत, अलिबागचा कुलाबा किल्ला, माझी ताई, अंगाई, आईचा सोहळा, चिंतामणी माझा, गजर तुझा मोरया, पिपाणी, मी नाद खुळा, माझी बायगो, आपली यारी, पोरी तुझ्या नादान, गोल्डी ची हळद, गोंधळ माय माऊलीचा, आपलीच हवा, इसक झालं रं, भन्नाट पोरगी, विठू घावला, रुप साजर असे अनेक गाणी तसेच चित्रपटातील काही गाणी अशा अनेक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन आणि दिग्दर्शन ज्यांनी कोले आहे असे अलिबागचे सचिन कांबळे यांना नुकताच प्लॅनेट मराठी तसेच सायली कुशल पिक्चर्स क्रियेस्शन यांच्या वतीने महाराष्ट्राचा युवा स्टार 2022 पहिले पर्व यामध्ये पारितोषिक मिळाले आहे.

सनिच कांबळे यांना शेकडो युट्यूब गाण्यातून बर्याच डायरेक्टर मधून संपूर्ण महाराष्ट्रातून बेस्ट डिरेक्टर नामांकन मिळाले होते आणि 21 तारखेला त्यांना बेस्ट डिरेक्टर पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्यांनी अलिबाग से आया क्या? असे म्हणणार्‍यांना एक जबर चपराक देणार्‍या गाणं सुद्धा तयार केले होते त्यामध्ये अलिबाग मधील 120 कलाकार सहभागी झाले होते.

अलिबाग कर नेहमीच त्यांच्या पाठीशी असतात त्यांना नेहमी सहकार्य करीत असतात, संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या गाण्याला बेस्ट दिग्दर्शक म्हणून पारितोषिक मिळाले आहे ते गाणे अलिबाग मध्ये चित्रीकरण झालेले आहे त्यामध्ये पीएनपी नाट्यगृह तसेच पीएनपी कॉलेज येथे त्याचे चित्रीकरण झालेले आहे आणि यासाठी चित्रलेखा नृपाल पाटील यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले असे मनोगत सचिन कांबळे यांनी व्यक्त केले.

Exit mobile version