| चिरनेर | वार्ताहर |
उरण भेंडखळ येथील कलासक्त दत्ता भोईर निर्मित लोककला महाराष्ट्राची हा देखणा कार्यक्रम 8 मे रोजी चेन्नईत सादर करण्यात आला. चेन्नई विजा 2023 या फेस्टिवल मध्ये महाराष्ट्राची लोककला लावणी व कोळी लोकनृत्य हे लोकनृत्य सादर करण्यासाठी कलासक्त दत्ता भोईर यांनी आपल्या सांस्कृतिक समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नेतृत्व करीत, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने निमंत्रित करण्यात आल्यामुळे महाराष्ट्राची लोककला सादर करण्यासाठी, चेन्नई येथील फेस्टिवलमध्ये उरणच्या सांस्कृतिक समूहाला संधी मिळाली.
या सादरीकरणासाठी रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. लावणी व कोळी नृत्य दिग्दर्शन महेश कांबळे यांनी केले. तर संगीत संयोजन सुबोध कदम, अभिजीत मोरे व प्रकाश पडवळ यांनी केले. नृत्य कलाकार म्हणून शुभम जाधव, धनेश गोंडल, नयन ससाने, प्रतीक्षा नांदगावकर, मेघा मुके, प्राजक्ता ठाकूर, ऋतिक पोवळे आणि चांदणी देशमुख आदींनी आपल्या नृत्य कला सादर केली.