। अलिबाग । वार्ताहर ।
रामायण कर्मे आद्यकवी महर्षी वाल्मीकी यांची जयंती गुरूवारी (दि.17) अलिबाग येथे साजरी करण्यात आली. याच प्रमाणे महर्षी वाल्मीकीचे जन्मस्थान जळगावा जिल्ह्यातीली वालझरी येथे आणि त्यांचे समाधीस्थळ वाल्हे येथे भव्य स्वरूपात मंदिर उभे रहावे, अशी प्रार्थना महाराष्ट्र मच्छिमार सेनेच्यावतीने करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र मच्छिमार सेनेचे मुख्य संघटक मंगेश पद्माकर कोळी, संतोष हरिभाऊ पाटील, ज्ञानदेव नागु तांडेल, जगन्नाथ ज्ञानदेव तांडेल, बाळु हरी भिकारी, यशवंत चंद्रकांत मुर्तगी, जनार्दन रामदास भगत, रामा विठोबा कोळी, डॉ. अक्षय रामा कोळी हे कोळी बांधव उपस्थित होते.