तळगड किल्ल्यावर महाशिवरात्री उत्सव

| तळा | वार्ताहर |

तळा शहरातील ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर महाशिवरात्री उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. स्वर्गीय हरिभाऊ चांडीवकर यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर महाशिवरात्री उत्सवास सुरुवात झाली. त्यांच्या पश्‍चात जयहरी सेवा मंडळातर्फे गेल्या पंधरा वर्षांपासून ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यावेळी गडावरील महादेवाच्या पिंडीच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी पहायला मिळाली. बाजारपेठेतून महाशिवरात्री निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विलास ठक्कर यांनी भगवान शंकराचे हुबेहुब रूप धारण केले होते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने वर्षातून एकदा तळगडावर जाण्याचा योग येत असल्याने भर दुपारी कडकडीत उन्हातही भाविक तळगड किल्ला चढत होते. यामध्ये लहान, तरुणांसह जेष्ठांचा सहभागही लक्षणीय होता. यावेळी गडावर अभिषेक, आरती, भजन, कीर्तन मान्यवरांचा सत्कार आदी कार्यक्रम पार पडले.

Exit mobile version