म्हसळामध्ये महाशिवरात्र मोठ्या जल्लोषात

| म्हसळा | वार्ताहर |

सालाबादप्रमाणे याही वर्षी संपूर्ण म्हसळा तालुक्यात महाशिवरात्र मोठ्या आनंदी आणि उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. महाशिवरात्र निमित्त गावागावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. खरंतर दक्षिण रायगडातील निसर्गाचे सानिध्यात वसलेल्या म्हसळा तालुक्यातील म्हसळा शहरातील स्वयंभू लखमेश्वर शिव मंदिर, देवघर अमृतेश्वर, शिवमंदिर, घूमेश्वर, तोंडसुरे जंगम वाडी, आगरवाडा, पाष्टी-कुणबीवाडी, वारळ आणि तालुक्यातील इतर ठिकाणी इतिहास कालीन स्वयंभू शंकरांचे स्थान आहेत. महाशिवरात्र उत्सवाला फार मोठ्या जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

तालुक्यातील 84 गावातून शिवभक्तांनी श्री शंकरांचे दर्शन घेतले. म्हसळा येथील शिवमंदिरात राजपूत समाजातर्फे याही वर्षी येणाऱ्या सर्व शिवभक्तांना उपवास फराळाचे मनोभावे वाटप करण्यात आले. देवघर येथील स्वयंभू अमृतेश्वर शिवमंदिरात आज पहाटे 5 वाजलेपासून काकड आरती, अभिषेक, सुस्वर भजने, कीर्तन अश्या भरगच्च कार्क्रमातून भक्तांचे भावीकदृष्टया मनोरंजन करण्याचा प्रयत्न आयोजकाकांकडून करण्यात आला. यावेळी काळसुरी येथील सुप्रसिद्ध बुवा उदय नाकती, जगदीश घोसाळकर बुवा आणि माणगाव -लहाणे येथील बुवा तुकाराम महाडिक यांच्या डबलबारी भजन आयोजित करण्यात आले. तोंडसुरे येथे गुरु डॉ. नीलकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वर यांच्या कृपाआशीर्वादाने भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले. समाजभुषण शिवैक्य सुरेशस्वामी जंगम यांचे प्रेरणेने प्रतिवर्षा प्रमाणे महाशिवरात्रौ उत्सव, जगतगुरू विश्वाराध्य, पंडिताराध्य जयंती व वरदशंकर महापुजा सोहळ्याचे (दि. 8 व 9) मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री दिनी सकाळचे सत्रात श्री मंन्मेश्वर महादेवास रुद्राभिषेक, शिवकथा वाचन, धर्मसभा, महीलादीन कार्यक्रम, पंडिताराध्य जयंती सोहळा, महाआरती, महाप्रसाद, दिंडी सोहळा, शिवपाठ, शिवभजन, वरद शंकराची महापुजा, मान्यवर व्यक्ती सत्कार सोहळा, विध्यार्थी गुणगौरव समारंभ, शक्तीपाठ आणि सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे गाव अध्यक्ष गजानन जंगम यांनी सांगितले तालुक्यात महाशिवरात्री उत्सावानिमित्त खास. सुनिल तटकरे, आदिती तटकरे, अनिकेत तटकरे, शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, तालुका प्रमुख सुरेश कुडेकर आदि मान्यवरानी भेटी देऊन दर्शन घेतले.

Exit mobile version