महात्मा बसवेश्‍वर जयंती साजरी

| म्हसळा | प्रतिनिधी |

कोकण उन्नती मित्र मंडळाचे बॅरिस्टर ए.आर.अंतुले संस्थापित वसंतराव नाईक कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात जगतज्योती महात्मा बसवेश्‍वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रभारी प्राचार्य दिगंबर टेकळे व महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. रायप्पा माशाळे यांनी बसवेश्‍वरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रा. माशाळे यांनी आपल्या मनोगतात बाराव्या शतकात सांगितलेले बसवेश्‍वरांचे विचार आजच्या तरुण पिढीला अवगत होणे गरजेचे आहे. या जयंती प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. रायप्पा माशाळे यांनी सर्वांचे आभार मानले.

Exit mobile version