एन.डी.स्टुडिओमध्ये ‘महाउत्सवा’ची महासुरुवात

| नेरळ | वार्ताहर |
कलाकारांना प्रोत्साहन देत त्यांना कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने महा उत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. कलाकारांचं नवचैतन्य, उत्साह पाहून समाधान वाटते, आपल्या महाराष्ट्राची कला, संस्कृती, अभिमानास्पद परंपरा जगभर पोहोचावी हीच इच्छा यंदाच्या महाराष्ट्र दिनानिमित्त. त्यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या ‘महा उत्सव’च्या प्रारंभी ते बोलत होते.

महाराष्ट्रातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी नितीन चंद्रकांत देसाई यांच्या पुढाकाराने प्रथमच महाराष्ट्राच्या महान परंपरेचा ‘महा उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. एन.डी. स्टुडिओच्या 47 एकरच्या विशाल जागेत 28 एप्रिल ते 1 मेदरम्यान हा उत्सव होत आहे. स्त्रीशक्तीचा जागर करणार्‍या भव्य बाईक रॅलीने महोत्सवाची सुरुवात झाली. 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील 5 हजार शालेय विद्यार्थी पाच हजार रुबिक्स क्युब्सचा वापर करत छत्रपती शिवाजी महाराज यांची जगातील सर्वात मोठी प्रतिमा बनवण्याचा विश्‍वविक्रम करणार आहेत. श्रेयसी वझे आणि मंदार आपटे यांच्या संकल्पनांतर्गत बनलेले ‘महाराष्ट्र गीत’ यावेळी सादर केले जाईल.
महाराष्ट्राचं वैभव एकाच ठिकाणी मांडणारा हा महा उत्सव वाखणण्याजोगा आहे. महाराष्ट्राची ही वैविध्यता जगभर विस्तारुंदे हीच इच्छ, अशा भावना खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्या. यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ निर्माते, लेखक, दिग्दर्शक एन. चंद्रा, आ. महेंद्र थोरवे, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन घडवणारे, मराठ्यांची गौरव गाथा, मायमराठी लोककला उत्सव, महालावणी उत्सव, बॉलीवूड घराणा, फ्युजन वाद्य संगीत अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असून शाहीर विनता जोशी वीर तान्हाजींचा इतिहास सादर करतील. ’महामेळा’ अंतर्गत राज्याच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन, विक्री होणार असून राज्यभरातून शेकडो छोटे व्यावसायिक आणि दुकानदार यांनी यासाठी नोंदणी केली आहे. ‘महाकला’ उपक्रमाद्वारे राज्यातल्या विविध लोककलांचे मनोहारी दर्शन घडणार असून गोंधळ, जागरण, भारुड, आदिवासी कला, धनगरी नृत्य, मर्दानी कला यांचं दर्शन घडवण्यासाठी 100 हून अधिक पारंपरिक कलावंत या महोत्सवात सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार, छायाचित्रकार यांच्या कलाकृतींची दालन तसेच ललित कलेची प्रत्याक्षिके आणि कार्यशाळादेखील महाउत्सवाचे वैशिष्ट्य आहे.

2008पासून मी एन.डी. स्टुडिओचा प्रवास पाहिला आहे. अनेक आव्हानांना झेलून मोठा प्रवास करत आज या यशाच्या शिखरावर हा स्टुडिओ पोहोचला आहे. हजारो कलाकारांना व्यासपीठ, रोजगार देत त्यांचे कार्य रसिकांसमोर आणण्याचे कार्य या स्टुडिओने केले आहे. या महा उत्सवाच्या निमित्ताने कलाकारांचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचत असल्याचा आनंद आहे.

अदिती तटकरे, पालकमंत्री
Exit mobile version