| पनवेल | प्रतिनिधी |
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वावंजे जिल्हा परिषद मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार लता डी.बी म्हात्रे, पंचायत समितीचे उमेदवार पराग भोपी व बाळू वारा तसेच आदई पंचायत समितीचे उमेदवार विलास फडके यांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना (उद्धवसाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, मा. तालुका प्रमुख विश्वास पेटकर, विभागप्रमुख प्रमोद पाटील, युवासेना विधानसभा चिटणीस जीवन पाटील, उपमहानगर प्रमुख रामदास गोंधळी, देवीचापाडा उपशाखाप्रमुख नंदू म्हात्रे, वावंजे शाखा प्रमुख परशुराम गायकर, उपतालुका प्रमुख बबन फडके आणि कार्यकर्ते उपस्थित होते.






