थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड. अंकिता मनीष माळी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
मुरूड नगरपरिषद नगराध्यक्ष व नगरसेवकपदाच्या 12 जागांसाठी शेकापसह मनसे व महाविकास आघाडीच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यात थेट नगराध्यक्ष पदासाठी शेकापच्या ॲड. अंकिता माळी यांनी अर्ज दाखल केला आहे.
मुरूड नगरपरिषदेच्या वीस जागांसाठी ही लढत आहे. सोमवार? दि.10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. यावेळी थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी शेकापच्या ॲड. अंकिता माळी यांनी अर्ज भरला आहे. तसेच, सदस्यपदासाठी प्रभाग दोनमधून संकेत अपराध (शेकाप), प्रभाग तीनमधून सिध्देश सुर्ती(शेकाप), प्रभाग चारमधून अनंत म्हशेलकर (शेकाप), रुमण्णा मजगावकर (शेकाप), प्रभाग पाचमधून मनीष माळी (शेकाप), प्रभाग सहामधून मनीष रामा (मनसे), युविका भगत (मनसे), रुमण्णा मजगांवकर (शेकाप), अंकित गुरव (मनसे), प्रभाग आठमधून प्रयास वरसोलकर (शेकाप), प्रभाग नऊमधून रसिका मयेकर (शेकाप) व प्रभाग दहामधून जागम पुळेकर (मनसे) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी शेकाप मुरूड तालुका चिटणीस विजय गिदी, तुकाराम पाटील, चंद्रकांत कमाने, मनोहर बैले, दिपेश गिदी, मधुकर ढेबे, गणेश पुगांवकर, सिध्देश सुर्ती, प्रकाश मयेकर, यश वरसोलकर, अनंत पाडगे, उमेश अपराध, आशिष पाडगे, शैलेश काते, अमोल पाटील, अनंत म्हसकर, आशिष हांडेकर, अशोक विरकूड, रुपेश धोत्रे, नीता गिदी, सुप्रिया गिदी, नंदा पाटील, अरुण मढवी, मेघराज पाटील, दश्रना वरसोलकर, जितेंद्र गार्डी, अलिबाग तालुका पुरोगामी युवक अध्यक्ष विक्रांत वार्डे, निशिकांत कोळसे, यश पाटील तसेच मनसेचे जागन पुळेकर, प्रवेश पालशेतकर, विघ्नेश जगताप, युवराज भगत, मनीष शाया, प्रवेश पुळेकर, सिध्देश खेडकर, आकाश खोत, केतन डोंगरीकर, पराग आरेकर, पंकज जगताप, गिरीधर सतावडेकर, ओंकार मानकर, अथर्व खोत, रुपेश भोईर, ऋनून साळुंखे, सिध्देश पालशेतकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.







