राज्यात महाविकास आघाडीच लयभारी

। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यातील नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस महाआघाडीने सर्वाधिक नगरपंचायती जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केलेले आहे.अनेक ठिकाणी स्वबळावर तर अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्या करुन ही निवडणूक लढविण्यात आली होती.सर्वच ठिकाणी दोन टप्प्यात मतदान झाले.

युवा नेत्यांना यश, दिग्गजांना धक्का
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकीकडे रोहित पवार, रोहित पाटील यांच्यासारख्या तरुण नेत्यांनी चमकदार कामगिरी करत ठसा उमटवला असताना दुसरीकडे धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे, एकनाथ शिंदे या दिग्गज नेत्यांना मोठा फटका बसला आहे. आपल्याच बालेकिल्ल्यात त्यांना पराभव सहन करावा लागला आहे. सातार्‍यात शिवसेना आ. महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेना जोरदार धक्का दिला आहे. बीडमध्ये भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचं वर्चस्व दिसून आलं. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मात्र धक्का बसला आहे. आष्टी, पाटोदा, शिरूर या नगरपंचायतींवर भाजपा आमदार सुरेश धस यांनी वर्चस्व मिळवत भाजपाचा झेंडा फडकवला आहे. तर वडवणी मध्ये सत्ताधारी भाजपाला बाजूला सारवत राष्ट्रवादीने विजय मिळवला.महाविकास आघाडीला 80 टक्के जागा मिळाल्या आहेत, याचा अर्थ भाजपाला जनतेने नाकारले आहे अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे

Exit mobile version