रसायनीत महाविकास आघाडीचा निषेध मोर्चा

निदर्शनातून केंद्र शासनाचा निषेध

| रसायनी | वार्ताहर |
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाल्याने मोहोपाड्यात रसायनी विभाग महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), शेकाप व मित्रपक्षांतर्फे शनिवारी सायंकाळी निषेध मोर्चा काढून केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला.मोहोपाडा येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

यानंतर शिवाजी चौकातून मोहोपाडा प्रवेशव्दारापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिला व बालकल्याण माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्षा उमा मुंढे, रायगड जिल्हा काँग्रेस युवक आयचे अध्यक्ष निखिल डवळे, माजी सभापती रमेश पाटील, माजी उपसभापती गजानन मांडे, माजी सरपंच कृष्णा पारंगे, माजी सरपंच अशोक मुंढे, अरुण गायकवाड, अनिल पिंगळे यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version