| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 4 आणि पंचायत समितीच्या 8 अशा एकूण 12 जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणूक निर्णयाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या 4 जागांसाठी सुरुवातीला 29 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 13 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 16 उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समितीच्या 8 जागांसाठी 46 अर्ज आले होते. त्यापैकी 2 अर्ज बाद झाले आणि 21 उमेदवारांनी माघार घेतली. आता 23 उमेदवार मैदानात उरले आहेत. त्यामुळे उरणमध्ये ही निवडणूक प्रामुख्याने महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी थेट आणि अटीतटीची होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार), शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या घटक पक्षांचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ताधारी भाजपकडून नगराध्यक्षपद खेचून घेतले होते. त्याच यशाची पुनरावृत्ती महाविकास आघाडी करणार असल्याचे बालेले जात आहे.
उरणमध्ये मविआची भाजपला टक्कर
