महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राज्यभरात

अनिल परब यांचे प्रतिपादन
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी ठरला असून आता हाच फॉर्म्युला राज्यात जाईल, असा विश्‍वास पालकमंत्री अनिल परब यांनी दापोली येथे बोलताना व्यक्त केला.
दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत आघाडीला यश आले असून, दोन्ही नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदी आघाडीचेच उमेदवार निवडून आल्याचे त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम दापोली येथे आयोजित केला होता.
यावेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी, संजय कदम, खासदार सुनील तटकरे यांनीही विचार मांडले. तर दापोली नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा ममता मोरे, उपनगराध्यक्ष खालिद रखांगे, मंडणगड नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला.
परब म्हणाले, महाविकास आघाडी काय करू शकते हे दापोली मंडणगड नगरपंचायत निवडणुकीने दाखवून दिले आहे. लोकांनी तुम्हाला एका विश्‍वासाने मतदान केले आहे या विश्‍वासाला पात्र ठरवण्याची जबाबदारी आजपासून 5 वर्षे नगरसेवकांची आहे.

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी माझी व खासदार सुनील तटकरे यांची जवळीक जास्त आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्याकडे माझी तर उपमुख्यमंत्री यांच्याकडे खा. सुनील तटकरे यांची जवळीक असल्याने विकासकामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. या मतदार संघात विकासकामांमध्ये कोणतीही शासकीय अडचण येणार नाही यासाठी आम्ही दोघेही प्रयत्न करू. – अनिल परब,पालकमंत्री, रत्नागिरी

Exit mobile version