अलिबागमधील प्रभाग दोन व चारमध्ये प्रचाराचा शुभारंभ
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचार वेगवेगळ्या प्रभागात सुरु झाला आहे. शहरातील प्रभाग दोनमधील सुषमा नित्यानंद पाटील, प्रभाग चारमधून रेश्मा मनोहर थळे, महेश वसंत शिंदे या उमेदवारांकडून प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी (दि.21) सायंकाळी झाला. श्रीबाग येथील अंबामाता देवी तसेच पोलीस लाईनमधील श्रीबापदेवाचे दर्शन घेऊन प्रचाराचा सुरुवात केली. तसेच प्रभाग तीनमधील उमेदवार साक्षी पाटील, आनंद पाटील यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील मतदारांना भेटून मतदान करण्याचे आवाहन केले. महाविकास आघाडीचा दमदार प्रचार दिसून आला.
महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रचाराचा धमाका सुरू झाला आहे. अलिबाग शहरातील प्रभाग तीनमधील उमेदवार साक्षी पाटील, आनंद पाटील यांचा प्रचार शुक्रवारी सायंकाळी करण्यात आला. शहरातील घरत आळी परिसरातील घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली. त्यांना मतदान करण्याचे आवाहन उमेदवारांनी केले. यावेळी शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, माजी नगरसेविका अश्विनी पाटील, महेश पाटील, अरुण पाटील, रवि आंबेकर, उदय ठाकूर, रितेश ठाकूर, सागर बडमे, विलास रानडे, विकास पाटील, दिपक म्हात्रे, श्रेयश पाटील आदी कार्यकर्ते या प्रचारात सहभागी झाले.
अलिबाग नगरपरिषद हद्दीतील थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार अक्षया नमिता प्रशांत नाईक तसेच प्रभाग दोनमधील नगरसेवकपदाच्या उमेदवार सुषमा नित्यानंद पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी सायंकाळी पोलीस लाईनजवळील बापदेव मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला. बापदेवाचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली. नवीन तळकरनगरमध्ये प्रचार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, नंदकुमार तळकर, बाबू भाई, कमळाकर पाटील, विजय नारे, नवाब पल्लवकर, महेंद्र सापगांवकर, नित्यानंद पाटील, तुकाराम जाधव, समीर गायकवाड, जयेश टोलकर, उदय तेली, सिध्दराज वार्डे, नवीन आवा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले होते.
प्रभाग चारमधील नगरसेवकपदाचे उमेदवार महेश शिंदे, रेश्मा घरत यांच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी सायंकाळी श्रीबाग दोन परिसरात करण्यात आला. अंबामातेचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी शेकाप कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक, रायगड बाजारचे उपाध्यक्ष प्रमोद घासे, वसंत शिंदे, काँग्रेसचे जिल्हा चिटणीस जगदीश कवळे, मनोहर थळे, विकास चवरकर, के.डी. पाटील, अनिकेत गुरव, तुषार वाईकर आदी महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
प्रशांत नाईक यांचा सत्कार
अलिबाग नगरपरिषदेच्या प्रभाग दोनमधील नगरसेवकपदाचे उमेदवार प्रशांत नाईक यांची बिनविरोध निवड झाली. भाजपच्या उमेदवाराने माघार घेतल्याने महाविकास आघाडीतील शेकाप, काँग्रेसचे उमेदवार प्रशांत नाईक यांना बिनविरोध घोषित करण्यात आले.शुक्रवारी सायंकाळी प्रचारादरम्यान तळकरनगर ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.









